AurangabadCrimeUpdate : रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराचा खून

औरंगाबाद- रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचा मृतदेह मिलींद महाविद्यालयाजवळ असलेल्या बारुदगरनाल्यात छावणी पोलिसांना आढळला.या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शेख माजेद शेख अली(२८) रा.गडकेश्वर असे मयताचे नाव आहे.२०१४साली बेगमपुरा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुन, खंडणी अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत.शनिवारी दुपारी छावणी पोलिसांना मृतदेहाची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी भेट दिली.या मृत्यू प्रकरणी मयताच्या वडलांचा जबाब छावणी पोलिसांनी नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन वायाळ करंत आहेत.