AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरच्या मोटरसायकल चोराकडून २२ मोटरसायकल जप्त, शेतकर्यालाही घेतले मदतीला

औरंगाबाद- सिटीचौक पोलिसांनी शहागंज भाजी मंडइ परिसरातून मोटरसायकल चोरतांनाच रेकाॅर्डवरील मोटरसायकल चोर पकडला.त्त्याच्या ताब्यातून २२मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.गोसखाॅं कालेखाॅं पठाण (३५) रा.नाणेगाव सिल्लोड हल्लीमु.ब्रीजवाडी असे अटक चोरट्याचे नाव आहे.याच्यावर २०१६मधे सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटरसायकल चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत.
त्याने सोबतीला एक शेतकरी मित्र घेतला त्याचे नाव नवाबखाॅं उस्मानखाॅं पठाण (४०) रा.गोद्री ता. भोकरदन असे आहे.त्याच्याकडे १०एकर शेती आहे. पण गेल्या वर्षभरापासून शेती नीट होत नसल्यामुळे नवाबखाॅं ने गोसखाॅं बरोबर भागीदारी सुरु केली. गौसखाॅं ने चोरलेल्या मोटरसायकल नवाबखाॅं च्या घरी लपवल्या जात असंत फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या मोटरसायकल विक्री केल्या आहेत . गेल्या काही महिन्यांपासून शहागंज, भाजीमंडी, कॅन्सर हाॅस्पिटल,जामा मस्जिद पार्किंग, नवाबजानी गल्ली या भागातून बर्याच मोटरसायकल चोरी गेल्याचे गुन्हे सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
या अनुषंगाने पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी विशेष पथकाला मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचारी संजय नंद आणि तायडे यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पार पाडली. त्यांच्या पोलिस निरीक्षक भंडारे सोबत पीएसआय काशिनाथ महांडुळे, पोलिस कर्मचारी गायकवाड, माजिद पटेल,देशराज मोरे, संतोष शंकपाळ यांनी सहभाग नोंदवला