IndiaCrimeUpdate : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

लखनऊ :उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील इनायतनगर पोलीस ठाण्याच्या अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील तिघांचे वय दहा वर्षापेक्षाही कमी होते . या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणी केली, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
या घटनेच एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. यात पती-पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या तिघांमधील दोन मुले तर एक मुलगी आहे. या तिघांचेही वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. असा अंदाज लावला जात आहे, की मालमत्तेच्या वादवरुन ही हत्या झाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. ही हत्या करण्यात किती जणांचा समावेश होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अयोध्येतले उच्च अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.
दरम्यान कोरोनाकाळातही देशात हत्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये कमी येत नसल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. राज्य सरकारने अशी सूचना दिली आहे, की आधीपासून असणारे निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहातील. योगी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.