Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात पण मृत्यूच्या संख्येत वाढ कायम

Spread the love

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून सलग सातव्या दिवशी देशात नवीन रुग्णांची संख्या ही ३ लाखाच्या आत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. परंतु कोरोनाने होणाऱ्या मृत्युंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी  केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२  नवे  रुग्ण आढळून आले तर ३ हजार ७४१ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला. यामुळे देशातील कोरोनाने होणाऱ्या मृत्युंची एकूण संख्या ही ३ लाखांजवळ पोहोचली आहे. देशात आतापर्यंत एकूण २ लाख ९९ हजार २६६ नागरिकांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५५ हजार १०२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यन्त एकूण २ कोटी ३४ लाखांहून अधिक नागरिक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आता २८ लाख ०५ हजार ३९९ नागरिकांवर उपचार सुरू आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात विक्रमी करोना चाचण्या होत आहेत. गेल्या २४ तासांत २१ लाख २३ हजार ७८२ जणांची करोना चाचणी झाली आहे. हा आतपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी दर घसरून तो ११.३४ टक्के झाला आहे. तर गेल्या २४ तासांत १६ लाख ४ हजार ५४२ जणांना लसीचा डोस देण्यात आला. आतापर्यंत देशात एकूण १९ कोटी ५० लाख ४ हजार १८४ डोस दिले गेले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!