AurangabadCrimeUpdate : बहीणीच्या मदतीने नवर्याचा खून, दोन बहीणीसहित ७ जणांना बेड्या

औरंगाबाद – कडेठाण शिवारात राहणार्या विवाहितेने अनैतिक संबंधास अडसर ठरणार्या नवर्याचा बहीणीच्या मदतीने २लाख रु.ची सुपारी देत खून केला.या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही बहीणीसहित पाच पुरुष अटक केले आहेत.
अशोक बाबासाहेब जाधव(५०) रा.कडेठाण ता.पैठण असे मयताचे नाव आहे. तर मयताची बायको रंजना, तिचा प्रियकर रामप्रसाद जाधव, बहीण मिना पठाडे, सर्व रा.कडेठाण तसेच संतोष पवार, बापू घोलप,अरुण नागरे,शाम तांबे सर्व रा.बदनापूर अशी अटक आरोपींची नावे आहेत.
रंजना आणि तिचा चुलत दीर रामप्रसाद जाधव यांचे अनैतिक संबंध मयत अशोक जाधव यास माहित झाले होते. त्यामुळे नवरा बायकोत सतत भांडणे होत.म्हणून चिडलेल्या रंजनाने स्वता:चे दागिने विकून नवर्याचा २लाख रु. पर्यंत सुपारी देऊन काटा काढायचा अशी कल्पना मोठी बहीण मिना पठाडे ला बोलून दाखवली.मिना पठाडे ला हे करणे फार अवघड नव्हते. कारण तिचे रंजनाचा नवरा अशोक जाधव शी अनैतिक संबंध होते. मिना पठाडे ने तिचा बदनापूर येथील मित्र संतोष पवार याला सुपारी दिली.व पेशी म्हणून १७हजार रु.रोख दिले. संतोष पवार ने १९ मे रोजी मिना पठाडे ला अशोक जाधव ला सोमठाण्याच्या डोंगरावर घेऊन येण्याचे सांगितले. म्हणून मिना पठाडे ने अशोक जवळ शरीरसुखाची मागणी करत त्याला सोमठाणा डोंगरावर नेले.तिथे संतोष पवार आणि त्याचे तीन साथीदार आधिच येऊन थांबले होते. त्यांनी अशोक जाधव चे हातपाय बांधून गळा दाबून खून केला.व मृतदेह देवगाव शिवारात फेकून दिला.या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखेने पूर्ण केला.
वरील कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय संदीप सोळंके, गणेश राऊत,पोलिस कर्मचारी श्रीमंत भालेराव, धीरज जाधव,प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, योगेश तरमाळे यांनी पार पाडली.