IndiaNewsUpdate : गो-मूत्रामुळे फुफ्फुसातील संसर्ग दूर होतो , खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांचा दावा

भोपाळ : कोरोनाच्या अनुषंगाने भाजप नेत्यांची वक्तव्ये सातत्याने गाजत असतात. भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनीही असेच एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार गोमुत्राचा अर्क घेतल्याने फुफ्फुसातील संसर्ग दूर होतो . यावर बोलताना त्या म्हणाल्या कि , “मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागत नाही. आणि मला कोरोनाही झाला नाही. सर्व लोकांनी स्वदेशी गायीचे पालन केले पाहिजे.” भोपाळमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी यावर भाष्य केले.
प्रत्येक व्यक्तीनं पिंपळ, वड आणि तुळस लावली पाहिजे. असं केल्यास अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासणार नसल्याचे ही म्हटले . यावेळी त्यांनी भोपाळमध्ये १ कोटी वृक्षारोपणाची घोषणा केली. तसेच ही झाडे जगवण्यासाठी पाण्याच्या टँकर्सचीही व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान “काही लोक मी गायब असल्याचं सांगत माझ्यावर बक्षिस घोषित करण्याच्या वार्ता करत आहेत. असे लोक सवैधानिक गुन्हा करत आहेत. त्यांना माफ केले जाऊ शकत नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम देवाचे आहे. मी माझ्या बंगल्यातूनच लोकांची मदत करत आहे. माझे सहकारीदेखील काम करत आहेत. केवळ आम्ही त्याचा प्रचार केला नाही. म्हणूनच मी गायब असल्याचे म्हणत आहेत,” असेही प्रज्ञा सिंह ठाकुर म्हणाल्या.