AurangabadCrimeUpdate : मोक्का लागलेला दरोडेखोर नौपाडा पोलिसांच्या ताब्यात , गुन्हे शाखेची कामगिरी

औरंगाबाद – ठाण्यातील नौपाडा पोलिसांना वाॅंटेड असलेला मोक्का लागलेला दरोडेखोर औरंगाबाद गुन्हेशाखेने जाधववाडी मोंढ्यातून पकडून नौपाडा पोलिसांच्या हवाली केला.
सेनाऊल कुद्दुस शेख(३०) रा. साहेबगंज झारखंड असे अटक आरोपीचे नाव असून नौपाडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर दरोडे व अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुन्हेशाखेला खबर्याने सांगितले होते की, शहरातील सराफा दुकानांची रेकी करुन दरोडा टाकणारी झारखंडची टोळी शहरात वावरत आहे.त्यानुसार शहरातील सराफांची एक बैठक पोलिसआयुक्तांनी घेत सराफांना खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या तसेच गुन्हेशाखेने तपासचक्र फिरवली होती. जाधववाडीतील आंब्याच्या गोडाऊन मधे काही झारखंडचे कामगार मजूरी करंत असल्याचे कळताच एपीआय अजबसिंग जारवाल यांनी पथकासह जाधववाडीतून १८ मजूरांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. तीन उत्तरप्रदेश, दोन पश्र्चिमबंगाल आणि १३लोक झारखंड मधून शहरात मजूरी करण्यासाठी आल्याचे उघंड झाले त्यामधे सेनाऊल कुद्दुस शेख हा रेकाॅर्डवरील आरोपी सापडला.अन्य लोकांवर राज्यात कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल नसल्याचे कळते.
दरम्यान सेनाऊल व त्याच्या सहा साथीदारांच्या विरोधात ठाणे कोर्टाने जामिनावर सोडल्यानंतर तारखेला हजर राात नसल्यामुळे अटकवाॅरंट बजावलेले आहे. वरील कारवाई पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे पोलिस निरीक्षक आघाव एपीआय अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, पीएसआय वाठ्ठल चासकर, योगेश धोंडे, पवन इंगळे, पोलिस कर्मचारी नितीन देशमुख यांनी सहभाग नोंदवला होता.