SocialMediaUpdate : ViralVideo : असे दोन व्हिडीओ जे तुम्हाला विचार करायला लावतील…

social media
नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ बऱ्याचदा विचार करायला भाग पाडतात असेच दोन व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत . यापैकी पहिला व्हिडीओ आहे नैराश्यपूर्ण वातावरणात जगण्याची उमेद दाखवणारा एक सकारात्मक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एक 30 वर्षीय युवती ऑक्सिजन मास्क लावून मृत्यूशी झगडत असताना ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्यावर थिरकत होती. न्यूज १८ लोकमतने हे वृत्त दिले आहे.
विशेष म्हणजे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले पण या निरागस तरुणीचा कोरोनाचा बळी घेतल्याचे हृदयद्रावक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात संबंधित कोरोनाबाधित तरुणीने अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. आयुष्यावर इतके प्रेम करणाऱ्या तरुणीची कोरोनापुढे हार झाल्यानं सोशल मीडियात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात डॉक्टर मोनिका लंगेह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संबंधित व्हिडिओ शेअर केला होता. डॉक्टर मोनिका यांच्या मते, संबंधित कोरोनाबाधित तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळू शकला नाही, म्हणून तिला कोविड इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला NIV on Invasive Ventilation वर ठेवण्यात आले होते. या व्यतिरिक्त रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि प्लाझ्मा थेरपीदेखील देण्यात येत होती. यावेळी संबंधित डॉक्टरांनी असंही सांगितलं होतं की, संबंधित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहेत. लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल. पण कोरोनाने तिचा बळी घेतला.
She is just 30yrs old & She didn't get icu bed we managing her in the Covid emergency since last 10days.She is on NIVsupport,received remedesvir,plasmatherapy etc.She is a strong girl with strong will power asked me to play some music & I allowed her.
Lesson:"Never lose the Hope" pic.twitter.com/A3rMU7BjnG— Dr.Monika Langeh (@drmonika_langeh) May 8, 2021
दुसरा व्हायरल व्हिडीओ
दुसरा व्हिडीओ आहे 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून केल्या जात असलेल्या भाजीची विक्रीचा. विशेष म्हणजे अनेकजण फॉर्च्युनरच्या बाहेर उभे राहून भाजी खरेदी करीत आहेत. स्वतःची जागा नसलेले आणि प्रचंड भाडेवाढीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण जुन्या गाड्यांमधून विविध वस्तूंची विक्री करतात परंतु नव्या कोऱ्या फॉर्च्युनरमधून भाजी विकताना पहिल्यांदाच आपण पाहू शकता. हा व्हिडिओ शिरगावातील असल्याचे व्हिडीओ शेअरकर्त्याने म्हटले आहे. ही फॉर्च्युनर कार एका डॉक्टरांची असून त्यांनी हा गाडी भाजी विकण्यासाठी त्या व्यक्तीकडे दिल्याचे व्हिडिओमधून सांगितले जात आहे.
https://youtu.be/Eyh_kwKRQlE