AurangabadCrimeNews : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले,पतीला बेड्या

औरंगाबाद – दारुड्या पतीने बेरोजगारीमुळे पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.
कृष्णा पारखे रा.जयभवानीनगर गल्ली नंबर १२ असे अटक आरोपीचे नाव आहे.२०१३साली कृष्णाचे नात्यातील मुलगी कल्पना तेरे हिच्याशी झाले.त्यांना सहा आणि साडेतीन वर्षाची दोन मुलेही आहेत.कृष्णा मजूरी करंत होता. व दारु पिण्याच्या सवयीचा आहे.मध्यंतरी सासुरवाडी पाचोड येथे मेव्हण्याशी आरोपी कृष्णा चे काही वाद झाले होते.त्यानंतर ११मे रोजी आरोपी ने सासुला फोन करुन घाणेरड्या शिव्या दिल्या.म्हणून सासरा जालिंदर तेरे यांनी पुन्हा फोन लावला तेंव्हा कल्पना ने फोन घेत आईला सासरी पाठवा असे फोनवर रडंत रडंत सांगितले.त्यानंतर थोड्याच वेळात कल्पना शेजारी राहणार्या तरुणीने कल्पनाचा भाऊ इश्वर याला कल्पना ने गळफास घेतल्याची माहिती फोन करुन दिली.मयत कल्पनाचे वडिल जालिंदर तेरे यांच्या फिर्यादीवरुन आज पहाटे १२.४७वा. कृष्णा पारखे व आई वडलांवर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कृष्णा घायाळ करंत आहेत.