AurangabadNewsUpdate : औरंगाबाद जिल्ह्यातील 469099 जणांचे लसीकरण

जिल्ह्यातील 469099 जणांचे कोविड लसीकरण
ग्रामीण भागात 2639 जणांचे लसीकरण
शहरी भागात 1765 जणांचे लसीकरण
औरंगाबाद : जिल्ह्यात दि. 7 मे रोजी एकूण 4404 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 2639 जणांनी तर शहरात 1765 जणांनी लस घेतली . दि. 7 मे 2021 पर्यंत एकूण 469099 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
दि. 7 मे 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 190896 जणांनी पहिला डोस घेतला तर 28179 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 219075 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 194411 जणांनी पहिला डोस घेतला तर 55613 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 250024 जणांचे लसीकरण झाले आहे.