Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : धक्कादायक : देशात २४ तासांत ३७८० जणांना कोरोनामुळे अंत , ३ लाख ८२ हजार ३१५ नवे कोरोनाबाधित

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी (४ मे २०२१) रोजी एकूण ३ लाख ८२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३७८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ०६ लाख ६५ हजार १४९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख २६ हजार १८८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३४ लाख ८७ हजार २२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ०६ लाख ६५ हजार १४९

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१

उपचार सुरू : ३४ लाख ८७ हजार २२९

एकूण मृत्यू : २ लाख २६ हजार १८८

करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ०४ लाख ९४ हजार १८८

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २९ कोटी ४८ लाख ५२ हजार ०७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १५ लाख ४१ हजार २९९ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात मंगळवारी करण्यात आली.

राज्यानुसार आकडेवारी

मंगळवारी, महाराष्ट्रात एकूण ५१,८८० करोनाबाधित तर ८९१ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली  असून महाराष्ट्रात आतापर्यंत ७१,७४२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजधानी दिल्लीत १९,९५३ रुग्ण आढळले तर ३३८ करोनामुळे दगावले. पश्चिम बंगालमध्ये १७,६३९ करोनाबाधित रुग्ण आढळले तर १०७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये १५,७८५ नवीन रुग्णांची तर २१० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!