AurangabadCrimeUpdate : पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या कैद्याचा अद्याप शोध नाही

औरंगाबाद – सोमवारी दुपारी हर्सूल कारागृहातून वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयातआणलेला कैदी मुख्यालयातील पोलिसाच्या ताब्यातून उपचारापूर्वीच पळाला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप हा कैदी पोलिसांच्या हाती लागला नाही.
शकील शेख आरेफ (२३) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. शकील विरुध्द छावणी पोलिस ठाण्यात २०१७ साली खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे. तो हर्सूल कारागृहात अंडर ट्रायल होता. मुख्यालयात कार्यरत असणारे एएसआय गणेश पवार यांनी दुपारी हर्सूल कारागृहातून शकील शेख ला घाटी रुग्णालयातआणले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्या स्पाॅट तपासअधिकार्याची स्पाट व्हिजीट होईल. जर एऐसआय पवार यांचा हलगर्जीपणा झाला किंवा नाही याचा उलगडा होईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.