CoronaMaharashtraUpdate : राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात आज ५६ हजार ६४७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६६९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. राज्यातील शनिवारच्या तुलनेत नवी रुग्णसंख्येत कमालीची घट दिसत आहे. तसेच, करोनाबाधित मृतांचा आकडाही नियंत्रणात आला असल्याचे चित्र आहे.
आज राज्यात ५६ हजार ६४७ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, आज दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाण ८४. ३१ टक्के इतके झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १. ४९ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७० हजार २८४ रुग्णांचे करोनामुळं प्राण दगावले आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या२, ७६, ५२, ७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर, राज्यात सध्या ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
56,647 new cases and 51,356 discharges and 669 COVID-19 deaths reported in Maharashtra today.
Active cases: 6,68,353
Death toll: 70,284 pic.twitter.com/voea0c6qjX— ANI (@ANI) May 2, 2021