CoronaIndiaUpdate : गेल्या तीन दिवसांत राज्यात 199573 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात 63,282 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 802 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 438 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 178 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 186 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
दरम्यान राज्यात गेल्या तीन दिवसांत जवळपास दोन लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात 61326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या तीन दिवसांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही 60 हजारांहून अधिक आहे.
गेल्या तीन दिवसांतील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी.
1 मे 2021 – 61326 रुग्ण कोरोनामुक्त
30 एप्रिल 2021 – 69710 कोरोनामुक्त
29 एप्रिल 2021 – 68537 कोरोनामुक्त
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 61326 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण 39,30,302 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 84.24 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 63282 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,73,95,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,65,754 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 40,43,899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 63,282 new cases, 802 deaths and
61,326 discharges; active cases 6,63,758 pic.twitter.com/pceF6f4XMM— ANI (@ANI) May 1, 2021