IndiaNewsUpdate : मिस्टर इंडिया बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे कोरोनामुळे निधन

बडोदा : मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा 34 वर्षीय बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे कोरोनामुळे निधन झाले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीश लाडने कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली असून दोन वेळा मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तसेच, मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले होते.
जगदीश लाडने कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले होते . जगदीश लाडने बडोद्यात आपला छोटा व्यवसाय सुरु केला होता. त्याने स्वत:ची जिम सुरु केली होती. त्या कामासाठी तो काही दिवस बडोद्याला स्थायिक झाला होता. तिथेच त्याचं निधन झालं. त्याच्या निधनावर मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनने शोक व्यक्त केला आहे.