IndiaNewsUpdate : कारण कोरोना : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना बडतर्फ करण्याची मागणी

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेला औषधी आणि ऑक्सिजनचा तुटवडा आणि वाढत्या कोरोना स्थितीला जबाबदार धरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी चिदम्बरम यांनी केली आहे.
I am appalled by the statement of the Union Health Minister that there is no shortage of oxygen or vaccines or Remedesivir.
I am also appalled by the statement of the U.P. Chief Minister that there is no shortage of vaccines in U.P.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 28, 2021
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, देशातील जनतेला मूर्खात काढले जात आहे. सरकारविरोधात जनतेने बंड पुकारले पाहिजे. ऑक्सिजन, लस आणि रेमडेसिवीरचा कुठलाही तुटवडा नाही, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य संताप आणणारे आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात लसीचा कुठलाही तुटवडा नसल्याचे म्हटल्याने आपल्याला राग येतोय, असे चिदम्बरम म्हणाले.
दरम्यान वृत्त वाहिन्यांवर दाखवले जाणारे फुटेज आणि वृत्तपत्रांमधील बातम्या खोट्या आहेत का? डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक खोटं बोलत आहेत का? सगळे व्हिडिओ बनावट आहेत का? देशातील सर्व नागरिकांना मूर्ख समजणाऱ्या या सरकारविरोधात जनतेने आता बंड पुकारले पाहिजे, असे चिदम्बरम यांनी म्हटले आहे.