Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : 61,181 रुग्णांची कोरोनावर मात , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के

Spread the love

मुंबई :  गेल्या २४ तासात राज्यात नव्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येने  पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा पार केला आहे.  धक्कादायक म्हणजे केवळ बाधितांचा आकडा वाढत  नाही तर मृतांच्या  संख्येतही वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात 63,309 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 61,181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यू दर 1.5 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 985 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 352 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 251 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 342 मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अदिक कालावधीपूर्वीचे असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यात एकाच दिवसात ५८ रुग्णांचा मृत्यू!

पुणे शहरात दिवसभरात 3 हजार 978 करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 4 लाख 10 हजार 504 इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तर याच दरम्यान 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 6 हजार 669 झाली. त्याच दरम्यान 4 हजार 936 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर 3 लाख 59 हजार 776रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

औरंगाबाद अपडेट 

नवीन रुग्ण : 1314 । एकूण रुग्ण : 121880

आज डिस्चार्ज झालेले रुग्ण : 1510 । एकूण  डिस्चार्ज झालेले रुग्ण : 107151

आज झालेले मृत्यू : 37 । एकूण मृत्यू  : 2464 । एकूण सक्रिय रुग्ण : 12265

आपलं सरकार

Click to listen highlighted text!