CoronaIndiaUpdate : चिंता कायम : नव्या कोरोनाबाधितांची संख्या साडेतीन लाखांच्या घरात

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात शनिवारी करोनाच्या ३ लाख ४८ हजार ९७९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. करोना रुग्णांची आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. देशात सलग चार दिवसांपासून ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. देशात करोनाने एकूण २ लाख १५ हजार ८०३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
देशात २७६७ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात ६७६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिल्लीत ३५७ जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
देशात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णही वाढत आहेत. देशाता सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ लाखांवर गेली आहे. देशात सध्या २६ लाख ७४ हजार २८७ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी यात १ लाख ३० हजार १९९ जणांची वाढ झाली आहे.
India reports 3,49,691 new #COVID19 cases, 2,767 deaths and 2,17,113 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,69,60,172
Total recoveries: 1,40,85,110
Death toll: 1,92,311
Active cases: 26,82,751Total vaccination: 14,09,16,417 pic.twitter.com/HuTqfJSx2b
— ANI (@ANI) April 25, 2021