AurangabadCrimeUpdate : थट्टा मस्करीत शिवीगाळ करणार्या तरुणाचा खून,आरोपीला तत्काळ अटक

औरंगाबाद – पैशाच्या मामूली देवाण घेवाणीवरून हर्सूलमधील तुळजाभवानी चौकात शनिवारी रात्री ९.३० वा.तरुणाचा खून करण्यात आला . या प्रकरणात खून करणार्या आरोपीला रविवारी पहाटे चार वा.हर्सूल परिसरातून तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली. यश सोमेश महेंद्रकर (२१) रा. एन११ असे मयताचे नाव असून राज नामदेव जाधव (१९) रा.हर्सूल असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राज हा रत्नागिरीला कृषी महाविद्यालयात पदवी चे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील महसूल विभागात काम करतात. आरोपी राज आणि मयत यश महेंद्रकर या दोघांसोबंत आणखी मयूर पार्क मधे राहणारा श्रीकांत शिर्के देखील उपस्थित होता. सध्या लाॅकडाऊन मुळे राज औरंगाबादला आई वडलांकडे आला होता.
आरोपी राजने यश महेंद्रकरला फोन करुन तुळजा भवानी चौकात बोलावून घेतले. एक वर्षापासून मयत यश हा आरोपी राजला मस्करी करुन शिवीगाळ करंत असे. त्याचा काटा काढायचा असा निर्णय आरोपीने घेतला होता. तसे करु नये म्हणून फिर्यादी आरोपी राजची समजूत काढंत होता.पण यश आणि राज च्या हाणामारीत राज ने यशला गुप्तांगाजवळ भोसकले. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनी यशला एम्स हास्पिटलला स्कूटीवर बसवून नेले.तेथे डाॅक्टरांनी आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याच्यावर उपचार सुरु असतांना रात्री पावणे ११वा. यश महेंद्रकरचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले पुढील तपास करीत आहेत.