IndiaNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयाचा ऑक्सिजनवरून केंद्र सरकारला दणका

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने कोविड १९ च्या परिस्थितीवर भाष्य केले असून न्यायालयाने याबाबत सुनावणी घेत केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. ऑक्सिजन पुरवठा आणि कोरोनासाठी आवश्यक असलेली औषधी यावरून केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या प्रकरणात स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या प्रकरणावर उद्या सुनावणी होईल असे सांगितले आहे.
Maharashtra reports 67,013 new #COVID19 cases, 62,298 recoveries and 568 deaths in the last 24 hours
Total cases: 40,94,840
Active cases: 6,99,858
Total recoveries: 33,30,747 pic.twitter.com/TcOkDzEvm4— ANI (@ANI) April 22, 2021
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना कोविड परिस्थितीवर राष्ट्रीय उपाययोजना बनवण्याची सूचना केली आहे. कोविड १९ च्या मुद्द्यावरून देशातील ६ विविध न्यायालयांनी सुनावणी घेतल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरू शकतो.
ऑक्सिजन, आवश्यक औषधांची पूर्तता आणि लसीकरण याबाबतीत राष्ट्रीय धोरण असले पाहिजे. कोविड १९ उपाययोजनेबाबत केंद्र सरकारची राष्ट्रीय योजना काय आहे? ती लवकर सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यात ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती, आवश्यक औषधांचा साठा, लसीकरण आणि लॉकडाऊन घोषित करण्याचा अधिकार राज्यांना आहे या ४ मुद्द्यावरून कोर्टाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे.