CoronaMaharashtraUpdate : ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित , ५६८ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ६७ हजार १३ कोरोनाबाधित वाढले असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे. याशिवाय आज ६२ हजार २९८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के एवढे झाले आहे.
Maharashtra reports 67,013 new #COVID19 cases, 62,298 recoveries and 568 deaths in the last 24 hours
Total cases: 40,94,840
Active cases: 6,99,858
Total recoveries: 33,30,747 pic.twitter.com/TcOkDzEvm4— ANI (@ANI) April 22, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असताना केंद्राकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक मदतीत दुजाभाव दाखवला जात असल्याचे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.