AurangabadCrimeUpdate : पोलिस उपायुक्तांच्या ‘मोड्यूल’ मुळे दीर्घकाळ फरार असलेली आरोपी जाळ्यात

जगदीश कस्तुरे
औरंगाबाद – पोलिसउपायुक्तांनी फरार आरोपींना पकडण्यासाठी तयार केलेल्या मौड्यूलमुळे आता पर्यंत २०० दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश मिळाले आहे.
सध्या हे मोड्यूल गुन्हेशाखा वापरत असून वर्षभरापूर्वी ते गुन्हेशाखेला हॅंडओव्हर करण्यात आले आहे.आज गुन्हेशाखेने एम. वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला.१३वर्षांपासून फरार असलेला आरोपी दिनेश माणिकचंद राजपूत (४०) रा.आम्रपाली बुध्दविहार परिसर वाळूज एमआयडीसी याला या मोड्यूल च्या मदतीने अटक करण्यात आली.
शहरातील निष्णात अधिकारी झोन क्रं १चे उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी हे मोड्यूल तत्कालिन पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या काळात तयार केले.फरार आरोपी शोधण्यासाठी ही एक सोशल मिडीयाचा वापर करुन तयार केलेली शास्त्रीय पध्दत आहे. या संकल्पनेवर उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी पाचवर्ष काम केल्यानंतर ती मूर्त स्वरुपात आणली.दोनवर्षांपासून हे मोड्यूल व्यवस्थित काम करंत आहे. पण कामाचा व्याप वाढल्यामुळे हे मोड्यूल गुन्हेशाखेकडे तज्ज्ञ केलेल्या माणसासहित सूपूर्द केले.आणि हे मौड्यूल गुन्हेशाखेला हॅंडओव्हर करण्याच मुख्य कारण म्हणजे गुन्हेशाखा आॅर्गनाईझ असते.सुरवातीलाच या मोड्यूल चा वापर करुन ४० वर्षांपासून सिटीचौक पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी पकडण्यात आला होता.
या मोड्यूल चे तीन वेगवेगळे पार्ट आहेत.पण इझीली असेसेबल डाटा,या सोप्या पध्दतीचा वापर करुन त्यावर काम केलं जाते. याच पध्दतीने चोरीस गेलेले वाहन सापडण्यासाठी एक वर्षापूर्वी उपायुक्त खाटमोडे यांनी आणखी एक मोड्यूल तयार केले.या मोड्यूल ला एम. परिवहन अॅप, इ -चलन अॅप यांचा उपयोग होतो. इ.चलन मशीन मधे शहरातून चोरीस गेलेल्या गाड्यांचे नंबर सेव्ह केलेले असतात. जर चोरीस गेलेली गाडी वाहतूक पोलिसांनी पकडली. तर पुन्हा पावती फाडतांना इ- चलन मशीन अर्लट देते. व चोरटा वाहनासहित पकडला जातो.असे आतापर्यंत अनेक वाहने पकडली आहेत.महाराष्ट्रात पहिल्यांदा ई-चलन मशीन द्वारे चोरीस गेलेल्या मोटरसायकल पकडण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी उपयोग केला.