Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशभरात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० नवे करोनाबाधित, १ हजार ५०१ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

कोरोना एक नजर…


एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 47 लाख 88 हजार 109

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 28 लाख 9 हजार 643

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 18 लाख 1 हजार 316

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 77 हजार 150

देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 डोस


नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

 

विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या देशात आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनसह डबल म्युटेशनही भारतात आढळून आले असून, त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. देशात करोना संक्रमण वेगाने  वाढत असून दररोज विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या रुग्णवाढीच्या आकडेवारीने आतापर्यंतचे २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

महाराष्ट्रातही  रुग्णवाढीचा नवा विक्रम

देशात महाराष्ट्र आणि दिल्लीत करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शनिवारी (१७ एप्रिल) दिवसभरात ६७ हजार १२३ करोनाबाधित आढळून आले. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.५९ टक्के इतका आहे. तर आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६,४७,९३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

विदर्भात एकाच दिवसात २३६ बळी

विदर्भात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून गेल्या २४ तासांत येथील अकरा जिल्ह्य़ांत तब्बल २३६ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभऱ्यात १६ हजार ४१ नवीन रुग्णांची भर पडली. नागपुरात दिवसभरात ४०, ग्रामीण ३३, जिल्ह्य़ाबाहेरील ६, असे एकूण   ७९ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर येथे ६ हजार ९५६ रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २३ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २४० रुग्ण आढळले. अमरावतीत ११ मृत्यू तर ७९९ नवीन रुग्ण,  चंद्रपूरला २३ मृत्यू तर १ हजार ५९३ रुग्ण, गडचिरोलीत १५ मृत्यू तर ४६६ रुग्ण, गोंदियात २२ मृत्यू तर ८८५ रुग्ण,  यवतमाळला २६ मृत्यू तर १ हजार ४८ रुग्ण आढळले. वाशीमला ८ मृत्यू तर ६२० रुग्ण आढळले. अकोल्यात १० मृत्यू तर ६५६ रुग्ण आढळले. बुलढाण्यात ६ मृत्यू तर १ हजार २८५ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १३ मृत्यू तर ४९३ रुग्ण आढळले. विदर्भात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ३३.४७ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!