Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सेल्फीचा मोह बेतला जीवावर , सहा जणांचा धरणात बुडून मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिक: सेल्फी काढण्याच्या नादात नाशिकमधील वालदेवी धरणावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे . यात पाच मुली आणि एका मुलाचा समावेश  आहे .

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि , नाशिकपासून जवळच वालदेवी धरण असून या धरणावर केलेले  बर्थडे सेलिब्रेशन सहा जणांसाठी शेवटचे ठरले आहे. एकूण ९ जणांचा ग्रुप धरणावर गेला होता. ग्रुपमधील एका मुलीचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस धरणावर करण्याचा बेत सर्वांनी आखला होता. त्यानुसार या सर्वांनी जोरदार सेलिब्रेशन झाले . आणि  त्यानंतर या सर्वांना सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि तिथेच घात झाला.

Advertisements
Advertisements

दरम्यान धरणाच्या कडेला उभे राहून सेल्फी काढत असतानाच तोल जावून पाच मुली खाली पाण्यात कोसळल्या. त्यांना वाचवण्यासाठी एका मुलाने उडी घेतली. मात्र, या सर्वांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ तसेच वाडीवरहे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने मदत व शोधकार्यात बरेच अडथळे आले. ही घटना कळताच या मुलांचे पालक व नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित ग्रुपमधील सर्व मुलं मित्र-मैत्रिणी होते. नाशिकच्या पाथर्डी भागात राहणारे हे सर्वजण होते, असेही सांगण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!