AurangabadNewsUpdate : घाटी रुग्णालयातून हजारो रेमिडिसवीर लंपास, तथ्थहीन माहिती – डाॅ.झिने

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून हजारो रेमिडीसवीर लंपास या उजेडात आलेल्या माहितीत काही तथ्य नाही. तरीही जबाबदारीची भूमिका घेत प्रशासनाने चौकशी करण्याची भूमिका घेतल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डाॅ.कैलास झिने यांनी सांगितले. घाटी प्रशासनावर असे आरोप का केले गेले याचाही आम्ही शोध घेत आहोत.सध्या देशभरात रेमिडीसवीर औषधाचा तुटवडा आहे. बर्याच ठिकाणी काळाबाजार होत असल्याची माहिती प्रसिध्द होते.या सर्व माहितीच्या आधारे जर कोणी आरोप करंत असेल तर त्याचाही शोध आम्ही घेत असल्याचे डाॅ.झिने म्हणाले