AurangabadNewsUpdate : राज्य उत्पादन शुल्क चे गोडावून फोडून जप्त दारु लंपास करणारे चोरटे गुन्हे शाखे कडून जेरबंद

औरंगाबाद : अमरप्रित चौकातील राज्य उत्पादन शुल्क चे गोडावून फोडून विविध गुन्ह्यात जप्त केलेली अडीच लाखांची दारु चोरणारे चोरटे गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहूल घुसर, पवन चावरिया, गोकुळ कागडा, सूरज चावरिया अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघांनी गोडावून फोडून दारु लंपास केल्याची कबुली गुन्हेशाखेला दिली.
मंगळवारी ६ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत वरील चोरट्यांनी एक्साईज विभागाचे अमरप्रित चौकातील गोदावून फोडून जप्त केलेली दारु लंपास केल्याची कबुली अधिक्षक सुधाकर कदम यांनी दिली.एक्साईज निरीक्षक अब्दुल जावेद कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आज संध्याकाळी ७ वा झाला.गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने वरील चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली. वृत्त हाती येई पर्यंत मुद्देमालाची तपासणी सुरु होतीम्हणून पुढील तपासासाठी आरोपींना क्रांतीचौक पोलिसांच्या हवाली करण्याची प्रक्रियाही सुरुच होती. अशी माहिती पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनी दिली.