Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : काय आहे देशातील कोरोनाची आजची स्थिती ?

Spread the love

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण १.३१ लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास ८०२ जणांचा मृत्यू झाला. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.


देशातील अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल १० लाखांजवळ पोहोचला आहे. सध्या हा आकडा ९.७४ लाख झाला असून रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच १० लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. देशात करोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रा दिसत असून गेल्या १० दिवसांपासून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण होत आहे. गुरूवारीही महाराष्ट्रात 56 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एकट्या मुंबईतून नऊ हजार नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय दिल्लीतही गुरूवारी जवळपास ७,५०० रुग्णांची भर पडली. दिल्ली-महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेशमध्येही करोनाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काल ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. करोनाचा शिरकाव झाल्यापासून हा उत्तर प्रदेशमधलाही सर्वाधिक आकडा आहे.

कोरोना अपडेट 

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ३० लाख ५७ हजार ९५३

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी १९ लाख १० हजार ७४१

उपचार सुरू : ९ लाख ७४ हजार २३३

एकूण मृत्यू : १ लाख ६७ हजार ६९४

करोना लसीचे डोस दिले गेले : ९ कोटी ४० लाख ९६ हजार ६८९

गुरुवारी कोणत्या राज्यात आढळले किती रुग्ण?

महाराष्ट्र : ५६ हजार २८६

दिल्ली : ७ हजार ५३७

उत्तर प्रदेश : ८ हजार ४७४

कर्नाटक : ६ हजार ५७०

गेल्या काही दिवसांत संक्रमित रुग्णांची संख्या

१ एप्रिल : ८१ हजार ३९८

२ एप्रिल : ८९ हजार ०२३

३ एप्रिल : ९२ हजार ९९४

४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४

५ एप्रिल : ९६ हजार ५६३

६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२

७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९

८ एप्रिल : १ लाख ३१ हजार ८७८

गेल्या काही दिवसांतील मृतांची संख्या

१ एप्रिल : ४६८

२ एप्रिल : ७१३

३ एप्रिल : ५१४

४ एप्रिल : ४७७

५ एप्रिल : ४४६

६ एप्रिल : ६३०

७ एप्रिल : ६८५

८ एप्रिल : ८०२

आपलं सरकार

Click to listen highlighted text!