IndiaNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आव्हान याचिका दाखल

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेचे कारण देत गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान राज्य सरकारपाठोपाठ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे वृत्त आहे.
Maharashtra Government moves Supreme Court challenging the Bombay High Court order in which it ordered the CBI probe against former Home Minister, Anil Deshmukh, for his alleged involvement in corruption, levelled by former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) April 6, 2021
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे काल दिल्लीला पोहोचले. अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर याचिका दाखल केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी याचिकाकर्त्या अॅोड. जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे.