AurangabadNewsUpdate : सज्ञान मुलीला पालक बंधने घालू शकत नाहीत

औरगाबाद – सज्ञान मुलीने कोणासोबंत राहाव या बाबत आई वडिल जबरदस्ती करु शकंत नाही. त्यांनी तसे केल्यास ते कारवाईस पात्र ठरतात असा निकाल न्या.रविंद्र घुगे आणि बी.यू.देबडवार यांच्या खंडपीठाने दिला
अंबाजोगाई येथील चंद्रशेखर चव्हाण यांची मुलगी डिसेंबर २० मध्ये घरातून बेपत्ता झाली होती. ती आप्तेष्ठांकडे मिळून न आल्यामुळे चव्हाण यांनी खंडपीठात धाव घेतली. व मुलगी बेपत्ता तसून तिच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज दाखल केला. खंडपीठाने या प्रकरणी बीड पोलिस अधिक्षकाना चव्हाण यांच्या मुलीला खंडपीठात हजर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आपल्या पध्दतीने मुलीच्या प्रियकरांच्या घरच्यांना उचलताच मुलगी खडपीठात हजर झाली. तिने खंडपीठाकडे निवेदन केले. की तिचा प्रियकर येत्या २९ एप्रिल रोजी वयाचे २१ वर्ष पूर्ण करत असून दुसर्याच दिवशी आम्ही विवाह करणार आहोत. तिची विनंती खंडपीठाने मान्य करंत बीडपोलिस अधिक्षकांना मुलीला तिच्या पालकांनी काही त्रास दिला असल्यास ते कारवाईस पात्र ठरु शकतात. याची चौकशी करा असेही आदेशात म्हटले आहे.
याचिका कर्त्या तर्फे अॅड. एस.एस. ठोंबरे व अॅड. मुरलीधर कराड यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे अॅड.एस.जी. सांगळे आणि एस.डी. मुंढे यांनी काम पाहिले.