Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा कोरोनामुळे मृत्यू , सोमवारी अंत्यसंस्कार

Spread the love

पुणे : पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनानंतर माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. त्यांचा मुलगा अमेरिकेतून आल्यानंतर त्यांच्या पार्थिवाववार सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात जण कोरोनाबाधित झाले आहेत. राजेंद्र सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या 15 दिवसांनी त्यांचे प्रमोशन होणार होते. सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते.  बीकॉम नंतर त्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपपत्र व जनसंवाद विभागातून पत्रकारित्याच्या पदवीनंतर त्यांनी करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारत मधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून  नियुक्ती झाली. राजेंद्र सरग हे पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते  त्यांच्याकडे उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

अजित पवार , सुप्रिया सुळे यांची श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “पुणे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सरग कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सरग यांना चांगले उपचार मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.

राजेंद्र सरग यांना मागील आठवड्यात कार्यालयात असतानाच त्रास होऊ लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसांतच त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससूनमध्ये  शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. गेत्यांच्या अकाली निधनाने शासकीय यंत्रणेला आणि पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!