Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादचा लॉकडाऊन कायम  ३० एप्रिलपर्यंत शनिवार , रविवार शहर राहील  पूर्ववत बंद 

Spread the love

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय  घेतला जाणार कि नाही याचे उत्तर अद्याप मिळाले नसले तरी राज्य शासनाच्या आदेशानुसार “मिशन बिगेन अगेन” अंतर्गत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील अंशतः लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम करण्यात आला असून शनिवार रविवारची संचारबंदीही कायम करण्यात आली आहे .

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी लागू केलेले मनाई आदेश यापुढे १५ एप्रिल ऐवजी आता ३० एप्रिल पर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीमध्ये संचारबंदी/मनाई आदेश लागू करण्यात येत आहेत. तसेच या कालावधी अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्णत: मनाई (प्रतिबंध) (अत्यावश्यक वस्तु व सेवा वगळता) असेल.

या आदेशात जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांनी  सांगितले की, ‘मिशन बिगेन अगेन’ आदेशाची अंमलबजावणी करतांना कोविड-19 काळात नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी वॉर्डनिहाय्य तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्‍यात यावे. सदरील पथकात जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे 2 व पोलीस प्रशासनाचा 1 कर्मचारी असे प्रत्‍येकी 3 पर्यवेक्षक असावेत. तसेच पाच पथकांसाठी एक निरीक्षक असावा. महानगरपालिकेतील गर्दीच्‍या तसेच संवेदनशील वॉर्डमध्‍ये आवश्‍यकतेप्रमाणे 4 पर्यवेक्षकांचे पथक असावे ज्यामध्ये 1 कर्मचारी हा महानगर पालिकेचा असेल. असे सांगण्यात आले आहे.

या निर्णयानुसार
१.  औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/सेवा वगळता रात्री 8 ते सकाळी 7 यावेळात संचार करण्यास प्रतिबंध असेल. मात्र या मधुन जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व विक्रीस परवानगी राहिल.
२.    सर्व ज्युस सेंटर, व रसवंती गृहे बंद राहितील, फक्त पार्संल घेऊनजाण्यास परवानगी राहिल. (रात्री 8 पर्यंत)
३.   औरंगाबाद जिल्ह्यात सर्व आठवडे बाजार 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण बंद राहतील.
४.    सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस  30 एप्रिल पर्यंत संपूर्ण बंद राहतील.
५.    नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेण्यास प्राधान्य देण्यात यावे.
असे अंशत: केलेले बदल वगळता जिल्हा प्रशासनाने २७ मार्च रोजीच्या आदेशामधील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहणार आहेत.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्य व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भा.दं.वि १८६० चे कलम१८८ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

औरंगाबाद कोरोना अपडेट

नवे रुग्ण  1394 एकूण रुग्ण :  86981

डिस्चार्ज : 1516  एकूण डिस्चार्ज :  69882

आजचे मृत्यू :  21. एकूण मृत्यू :  1758

सक्रिय रुग्णांची संख्या : 15341

आपलं सरकार

Click to listen highlighted text!