MaharashtraNewsUpdate : राज्याच्या बैठकीत औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर डेंजर झोनमध्ये !!

औरंगाबाद । राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात कठोर निर्बंध लादण्याची तयारी राज्य सरकारने केली असली तरी राज्यातील ८ शहरांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्हा डेंजर झोन मध्ये असल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत या सर्व जिल्ह्यात काय उपाय योजना करायची याचा निर्णय मुख्यमंत्री स्वतःच जाहीर करणार असल्याचेही टोपे म्हणाले .
प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले कि , लॉकडाऊन शब्द वापरायची काही गरज नाही. पण कठोर निर्बंध लादण्याची नक्कीच गरज निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती प्रत्येकाकडून जाणून घेतली असून राज्याच्या सचिवांना त्यांनी योग्य ते आदेश दिले आहेत.
हे आहेत ” ते” ८ जिल्हे…
देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या टॉप-१० मधले तब्बल ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. या जिल्ह्यांमधील गर्दी थांबवावीच लागणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंधांची घोषणा मुख्यमंत्री ठाकरेंकडून केली जाण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर या शहरांमध्ये कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या शहरांसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
कोरोना साखळी तोडण्यासाठी पर्याय नाही
टोपे म्हणाले कि ,राज्यात लॉकडाऊन शब्द वापरण्याची काही गरज नाही. जेव्हा तुमच्याकडची सर्व संसाधनं संपतात. परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा लॉकडाऊन करुन साखळी तोडण्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. पण सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यात कोरोना वाढू नये यासाठी निर्बंध लागू आहेत. तरीही लोक नियम पाळत नाहीत हे वारंवार दिसून आलं आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळली आणि नियमांचे तंतोतंत पालन केलं तर लॉकडाऊनचा विषयच येणार नाही.
दरम्यान गर्दीची ठिकाणे थांबवावीच लागतील असे ठामपणे सांगून मुंबईतील लोकल पूर्णपणे बंद केल्या जाणार नाहीत. लोकलबाबतही आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. लोकल प्रवासाबाबत नव्या गाइडलाइन्स जारी कराव्या लागतील. लोकलमध्ये कसे राहावे याचे काही नियम जारी केले जातील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.