SharadPawarNewsUpdate : ताजी बातमी : शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखीच्या आजारामुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते मात्र आजच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे . शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या चमूचे आभारही मानले. तर, राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधाताना दिली.
येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील. पण, तूर्तास मात्र शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, शरद पवार हे 31 तारखेला रुग्णालयात दाखल होणे अपेक्षित होते . पण, त्यांचे दुखणे वाढल्यामुळे निर्धारित वेळेआधीच त्यांना मुंबईचील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले . पोटात दुखू लागल्यामुळे रविवारी ते रुग्णालयात गेले होते. जिथे तपासणीनंतर त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता.अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
पवारांनी मानले सर्वांचे आभार
दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात होती. त्याबद्दल शरद पवार यांनीही काल सकाळीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांचे आभार मानले.
Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your good wishes for my speedy recovery!@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
सोशल मीडियातून शरद पवार लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , ”माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांचे बळ मिळाले. मनपूर्वक धन्यवाद !.
शरद पवार यांच्या प्रकृतीची दिल्लीती दिग्गज नेत्यांनीही विचारपूस केली. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांसह अनेक दिग्गजांचे पवार यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत. दरम्यान, पुढील दोन आठवड्यांसाठी शरद पवार यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
पश्चिम बंगाल दौरा रद्द
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पवार बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व निवडणूक प्रचार दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या.
माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांचे बळ मिळाले.
मनपूर्वक धन्यवाद!— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
दिग्गजांकडून विचारपूस
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे पवार यांनी ट्विटरवर सांगितले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले.