MumbaiNewsUpdate : सचिन तेंडुलकर कोरोनाबाधित

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. आपण होम क्वारंटाईन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे असे सचिनने म्हटले आहे.
“कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे. तसेच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असेही सचिनने म्हटले आहे.