CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाची रेकॉर्डब्रेक घोडदौड : 36,902 नवे रुग्ण , 112 मृत्यू

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णसंख्येने रेकॉर्ड तोडला असून गेल्या 24 तासात 36,902 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज राज्यात 112 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर 2.04 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने धुमाकूळ घातला असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपूर या तीनही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबईत आज 5513 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय सध्या मुंबईत 37804 सक्रिय रुग्ण असून 43 कटेंन्टमेंट झोन जाहीर केले आहेत. त्याशिवाय मुंबईतील 497 इमारती सील करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत रुग्णांचा आकडा 5 हजारांहून अधिक आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.