CoronaIndiaUpdate : देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांच्या नोंदीचा उच्चांक

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे. भारतात गेल्या २४ तासात ५९ हजार ११८ नवे रुग्ण आढळले असून ३२ हजार ९८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली असून १ कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख २१ हजार ६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ९४९ इतकी आहे. देशात आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख ४ हजार ४४० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
India reports 59,118 new COVID19 cases, 32,987 recoveries, and 257 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,18,46,652
Total recoveries: 1,12,64,637
Active cases: 4,21,066
Death toll: 1,60,949Total vaccination: 5,55,04,440 pic.twitter.com/GEzQNlbjLb
— ANI (@ANI) March 26, 2021