Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांच्या नोंदीचा उच्चांक

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे. भारतात गेल्या २४ तासात ५९ हजार ११८ नवे रुग्ण आढळले असून ३२ हजार ९८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisements

देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली असून १ कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख २१ हजार ६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ९४९ इतकी आहे. देशात आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख ४ हजार ४४० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!