राज्यातले उच्च न्यायालये उद्या बंद, सर्व न्यायमूर्ती गोव्यात

औरंगाबाद : उद्या २६ मार्च रोजी गोव्यात मुंबई उच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती तसेच औरंगाबाद ,नागपूर ,गोवा,पणजी खंडपीठातील सर्व न्यायमूर्तींचे फुलकोट किंवा फुलहौज (फॅमीली गेट टुगेदर आहे.अशी माहिती मुंबई उच्चन्यायालयाचे निबंधक जनरल एस.जी. दिगे यांनी दिली. मागील वर्षी २ डिसेंबर २०२० ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या फुलहौजसाठी सर्व न्यायमूर्ती आज गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे २६ मार्च रोजीचे न्यायालयीन कामकाज दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी ठेवण्यात येईल. मुंबई आणि नागपूर खंडपीठाचे कामकाज १७ एप्रिल २१ रोजी ठेवण्यात येईल तर औरंगाबाद खंडपीठाचे काम २१आँगस्ट२१तर गोवा,पणजी खंडपीठाचे कामकाज १९ जून २१ रोजी ठेवण्यात येईल. दरवर्षी फुलहौज चे मध्ये आयोजन करण्यात येत असते अशी माहिती सूत्रांनी दिली.