Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaCoronaUpdate : बीड जिल्ह्यात अखेर कडक लॉकडाऊन जाहीर , वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद

Spread the love

बीड : अखेर बीड मधील कोरोनाची चिंताजनक स्थिती लक्षात घेता बीड जिल्हा प्रशासनाने  जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. उद्या  गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून 4 एप्रिलच्या बारा वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान जिल्ह्यातील पूर्ण वाहतूक व्यवस्था बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान अत्यावश्यक सेवा जरी चालू असल्या तरी किराणा दुकाने मात्र सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या वेळेमध्ये सुरू असतील तेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरु ठेवावीत असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.

यावर पूर्णतः बंदी असेल 

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शहरातील उपहारगृह, सर्व रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स, मॉल बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. सर्व सलून, ब्यूटी पार्लर दुकाने संपूर्णत: बद राहतील. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत बंद राहतील. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत बंद राहतील.  अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर करता येणार आहे. सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.  सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारचे बांधकामे संपूर्णत बंद राहतील मात्र  शासकीय बांधकामे चालू राहतील या ठिकाणी काम करणा-या कर्मचाऱ्यांना पास देण्यात येणार आहे. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह संपूर्णत बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ संपूर्णत बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. धार्मिक स्थळ/सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णत: बंद राहतील. बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये संपूर्णतः बंद राहतील. परंतु 31 मार्च 2021 अखेरीस  बँकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल. कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल.  Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहतील.

हे सुरु राहील पण निर्बंध कायम 

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी 7 ते 9 वाजेपर्वत सुरु राहतील किरकोळ विक्रेत्यांना 7 ते 9 या वेळेतच केवळ दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील

दुध विक्री व वितरण सकाळी 10 वाजेपर्यंत घरपोच  राहील तथापि दूध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील संबंधित दूध विक्रेता व वितरक यांनी अॅंटीजन आरटीपीसीआर केलेली असणे बंधनकारक असेल

भाजीपाला व फळांची  विक्री सकाळी 7 ते 10 या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील. किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता मास्क लावून गल्लोगल्ली फिरुन सकाळी 7 ते 12 या वेळेतच विक्री करतील

सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल.

ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याशी संलग्न असलेली सर्व दुकाने  4 एप्रिलपर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील. शिवाय बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंप, नगर रोड, बीड, साई पेट्रोल पंप, बार्शी रोड, बीड हा पेट्रोल पंप 24 तास चालू राहील

आपलं सरकार

Click to listen highlighted text!