MaharashtraPoliticalNewsUpdate : गृहमंत्री अनिल देशमुख आरोप प्रकरणी पवारांचा “सेफ गेम ” सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना : चौकशीचे निर्देश

मुंबई । माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे आज मुंबई आणि दिल्ली हादरत राहिली . परमबीर सिंग यांच्या लेटर बोंच्या भूकंपाचे केंद्र मुंबई असूनही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दिल्ली मुक्कामी असल्यामुळे आपल्या विश्वासू नेत्यांना बोलवून या प्रकरणातून कसा मार्ग काढायचा याची रणनीती ठरविण्यात आली असल्याचे वृत्त आहे . गृहमंत्र्यांच्या वसुली प्रकरणाच्या आरोपावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून पवारांनी या सर्व प्रकरणात ” सेफ गेम ” खेळत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात ढकलला आहे . शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
पवार म्हणाले कि , सरकारवर या प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. या प्रकरणाचा शासन हा गांभीर्याने घेत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आमच्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतली. यावर अजून चर्चा झाली नाही, चर्चा करू. तसेच या प्रकरणी मी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही. आज निवासस्थानी दिल्लीत बैठक घेण्याच्या संदर्भात, माझ्याशी अशी कोणतीही वेगळी भेट नाही. एक पूर्व नियोजित वेगळी बैठक आहे जी आज होईल. अनिल देशमुख यांच्या विषयावर जे काही निर्णय घेईल, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी बोलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असंही शरद पवारांनी सांगितलं.
दरम्यान या प्रकरणात राज्याचे ज्येष्ठ सेवानिवृत्त आयपीएस असंधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करण्याचे निर्देशही पवारांनी दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मात्र कुठलेही ठोस उत्तर देणे पवारांनी टाळले असले तरी गृहमंत्र्यांवरील हे आरोप गंभीर असल्याचे मान्य केले आहे. माध्यमांनी त्यांना देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी विचारले तेंव्हा अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, ते योग्य तो निर्णय आम्हाला विचारून घेतील, असे सूतोवाच केले.
पवार म्हणाले कि , ‘राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात आले आहे हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या पत्राचे दोन भाग आहे. त्यांच्या पत्रामध्ये, प्रत्यक्ष पैसे जमा करण्याविषयी कोणतीही माहिती नाही. हे पैसे कुठून घेतले आणि ते कधी हस्तांतरित केले गेले, याविषयी पत्रात काहीही सांगण्यात आले नाही. त्या पत्रावर परमबीर यांची सही नाही. तसंच ‘परमबीर सिंग यांनी पत्रात माझा उल्लेख केला आहे आणि आम्ही भेटलो देखील आहे. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांनीच घेतला होता. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतला नाही’.