SocialMediaUpdate : Whatsapp सेवा बंद झाल्याने यूजर्स त्रस्त

औरंगाबाद : रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक मोबाईलवरचं व्हॉट्सअॅप बंद झाल्याने सर्व यूजर्स त्रस्त झाले होते. प्रारंभी इंटरनेट बंद झाले असेल असे युजर्सना वाटले परंतु प्रत्यक्षात जगभरात अनेकांना हा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया ट्विटरवर येऊन धडकल्या . शुक्रवारी रात्री 11 नंतर जगभरात अनेक ठिकाणी Whatsapp , Instagram या सेवा ठप्प झाल्या. या सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. नेमका काय तांत्रिक समस्या निर्माण झाली हे सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान जगभरात अनेकांनी हा इश्यू असल्याचं लक्षात येताच Twitter च्या माध्यमातून मांडला. हा व्हायरसचा हल्ला आहे की काही तांत्रिक समस्या आहे, हे कळू शकले नाही. फेसबुककडून अजूनही औपचारिकपणे काही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान शुक्रवारी 10.55 च्या सुमारात सुरुवातीला Whatsapp आणि नंतर फेसबुक तसंच इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट होऊ शकलं नाही. भारतासह युरोप आणि अमेरिकेत काही ठिकाणी हीच समस्या जाणवल्याचं यूजर्सनी कळवलं आहे. गेल्या महिन्यात 19 फेब्रुवारीलासुद्धा अशाच प्रकारे फेसबुक ठप्प झालं होतं. पण तो प्रश्न थोड्याच वेळात सुटला होता. साधारण अर्ध्या तासाने Whatsapp आणि फेसबुकच्या सेवा भारतात सुरू झाल्या. अजूनही काही भागात या फेसबुक उघडायला समस्या येत असल्याचं काही यूजर्सनी सांगितलं.