राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावे लागेल : उद्धव ठाकरे

राज्यात लसीकरण वेगाने वाढवले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावे लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावे लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली. लस घेतल्यानंतर ते म्हणणले की, लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मी स्वत: लस घेतली आहे आता जनतेनेही घ्यावी, असे मी सर्वांना आवाहन करतो. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.