15 मार्च ते 21 मार्चपर्यंत नागपूर शहरात लॉकडाऊन ; काय सुरु / काय बंद राहणार?

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असे आवाहन देखील नितीन राऊत यांनी केले आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.
काय सुरु / काय बंद राहणार?
हे लॉकडाऊन नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत लावले जाणार आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. या काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील. तसेच लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे.