Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर आरोप

Spread the love

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपने  सभागृहात गदारोळ घालत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न  केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना  ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना हटवतो असे  आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते मात्र नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आणि नाही सांगितले ‘ असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले कि , सभागृहात मनसुख हिरेन यांच्या हत्येबद्दलचा पत्नीचा जबाब मी वाचून दाखवला. हिरन यांची जी गाडी स्फोटके  ठेवण्याकरता वापरण्यात आली ती गाडी वाझेंनी नोव्हेंबर ते 5 फेब्रुवारीपर्यंत वापरली होती. तीन दिवस वाझे आणि हिरेन एकत्र होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांना हिरेन यांनी लिहिलेलं पत्र वाझेंनी सांगितले होतं’असा दावाही   फडणवीस यांनी केला.

दरम्यान ‘हिरेन यांचे शेवटचं टॉवर लोकेशन धनंजय गावडे यांच्या मालकीच्या जमिनीवर होते.  धनंजय गावडे हे 2017 च्या खंडणी प्रकरणात वाझेंसह सहआरोपी होते. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात आणि नंतर त्यांची हत्या होते. याचा अर्थ तिथेच त्यांची हत्या झाली’, असा आरोप फडणवीस यांनी केला. वाझे हे CIU (Crime Intelligence Unit चे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना पुरावे हटवायला संधी आहे. म्हणून वाझेंना अटक झाली पाहिजे. वाझेंना बाजूला केले  तर अनेक जण अडचणीत येऊ शकतात. गृहमंत्र्यांनी वाझेंना हटवतो असे आश्वासन दिले होते पण नंतर मुख्यमंत्र्यांसोबत  बैठक झाली आणि नाही सांगितले, असा आरोपच फडणवीस यांनी केला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे सरकार पुरस्कृत होतं का? एटीएसच्या आणखी एका अधिकाऱ्याचं यात नाव येत आहे.  या प्रकरणात सरकार पूर्णपणे उघडे पडले आहे, असा टोलाही फडणवीसांना लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!