बहीण रागावल्याने हर्सूल तलावात जीव देण्यासाठी गेलेल्या मुलीला सुरक्षा रक्षकाने वाचवले

औरंंगाबाद : मोबाईलवर सारखी कोणाला बोलत असते असे म्हणत मोठ्या बहिणीने रागावल्याचा राग मनात धरून हर्सूल तलावात जीव देण्यासाठी गेलेल्या मुलीला सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत वाचवले. हा प्रकार बुधवारी (दि.२४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. कैलास वाणी असे मुलीला वाचविणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
मोबाईलवर सारखी कोणाला बोलत असते असे म्हणत मोठी बहिणी रागावल्याने पिंकी (नाव बदलले आहे) ही हर्सूल तलाव परिसरात जाऊन बसली होती. दुपारी तीन वाजेपासून ती हर्सूल तलावाकडे चकरा मारत असल्याचा प्रकार सुरक्षारक्षक कैलास वाणी यांच्या लक्षात आला. कैलास वाणी यांनी तलावात उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पिंकीला पकडून आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर वाणी यांनी दामीनी पथकाशी संपर्वâ साधला. दामिनी पथकाच्या पोलिस नाइ्रक निर्मला निंभोरे श्रूती नांदेडकर, कविता धनेधर यांनी पिंकीला ताब्यात घेवून महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्याकडे नेले.
यावेळी पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी पिंकची चौकशी केली असता, तीने बहीण रागावल्याने मला जगायचे नाही, त्यामुळे मी आत्महत्या करण्यासाठी गेले होते असे सांगितले. तसेच आपल्या जवळील मोबाईल तलावात फेकला असल्याचे सांगितले. दामीनी पथकाने पिंकीच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्यांचे समूपदेशन केले.