शहरातील उद्योजकाचा मुंबईतील भागीदाराला ७कोटींचा गंडा, गुन्हा दाखल होताच कुटुंबासह फरार

औरंगाबाद- पाच वर्षांपासून भागीदारीत कंपनी चालवणार्या उद्योजकाने मुंबईतील भागीदाराला ६कोटी ७८लाख रु.चा चुना लावला.या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच उद्योजक कुटुंबासह फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अनिल राँय(४०)पत्नी संगीता राँय व प्रविण आणि सुनिल राँय अशी फरार आरोपींची नावे आहेत. वरील आरोपी वाळूज औद्योगिक परिसरात आँर्बिट इलेट्र्कोमेक या नावाची कंपनी चालवतात. आरोपींचा ईलेक्र्टीक पँनल तयार करण्याचा कारखाना आहे. तर देवाराम संगताराम चौधरी (३६) रा.गोरेगाव मुंबई असे फसवणूक झालेल्या भागिदाराचे नाव आहे सोनालिका मेटल काँर्पौरेशन नावाने चौधरी स्टील सप्लाय चा व्यवसाय करतात
२०१७साली आरोपी राँय ने मेलवर ३५ लाख रु.चे स्टील खरेदी करण्याची आँर्डर सोनालिका मेटल्स ला दिली. या आँर्डरचा सप्लाय चौधरी यांनी केल्यानंतर थोडे पैशे देऊन राँय यांनी आणखी ५०लाख रु.ची आँर्डर चौधरी यांना दिली. ५०लाखांचा माल सप्लाय केल्यावर चौधरी यांना राँय यांनी पैशासाठी टाळणे सुरु केले. म्हणून चौधरी यांनी औरंगाबदेत राँय यांची प्रत्रक्ष भेट घेत पैशाची मागणी केली.पण पैशे देण्याऐवजी राँय यांनी चौधरी यांना पार्टनर होण्याची गळ घालंत भागिदार करवून घेतले.व कोर्या लेटरपँडवर सह्या घेतल्या.व कंपनीत चौधरी यांच्या खोट्या सह्या करुन व्यवहार केल्याच्या नोंदी घेतल्या वचौधरी यांना पार्टनरशीप मधून मुक्त केले.वरील सर्व घटनाक्रम हा २०१७ते २०१९ या कावात झाला.पण राँय यांच्याकडून कोणतीही रक्कम मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी औरंगाबाद पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास करण्याचे आदेश पोलिसआयुक्त निखील गुप्ता यांनी आर्थिक गुन्हेशाखेला दिले. म्हणून पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय सूर्यवंशी , पोलिस कर्मचारी महेशउगले आणि विठ्ठल मानकापे करंत आहेत.