#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
#CurrentNewsUpdate
Breaking | LatestUpdate |जालना : शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश. याशिवाय जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार देखील बंद ठेवण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. #JalnaUpdate : शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार मार्चअखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
Breaking | LatestUpdate | औरंगाबाद: शहरात आज रात्री पासून संचारबंदी लागू होणार, 14 मार्च पर्यंत असेल रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, याकाळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय झाला. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार आहे.
11:45 AM 23 FEB 2021 : विनामास्क आढळल्यास 1000 रुपयांचा दंड ही अफवा, विनामास्क आढळल्यास 200 रुपयांचा दंड, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची माहिती, नागरिकांना मास्क घालण्याचेही पोलीस आयुक्तांच आवाहन.
11:26 AM | 23 FEB 2021 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेजुरीच्या खंडेरायाची माघी पौर्णिमेची यात्रा रद्द केल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. येणाऱ्या शनिवारी माघी पौर्णिमा आहे. त्यादिवशी खंडेरायाची यात्रा भरते परंतु भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.. तसेच खंडेरायाचे मंदिर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी भाविकांसाठी बंद असेल. जेजुरी गडाच्या पायथ्याशी बॅरिकेट्स बसवण्यात येणार आहेत. गडावर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मंदिर जरी भाविकांसाठी बंद असले तरी धार्मिक विधी हे नित्यनेमाने केले जातील.
10:27 AM | 23 FEB 2021 : जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फोजदार प्रवीण देशमुख यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले ते 54 वर्षाचे होते, त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर 12 तारखेपासून उपचार सुरू होते, आज औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
8:23 am | 23 FEB 2021 : लातूरमधील एकाच वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; लातूर एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार, महापालिकेनं केलेल्या तपासणीत 420 पैकी 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, सर्व विद्यार्थ्यांवर क्वॉरंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
7:14 AM | 23 FEB 2021 : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत : गृहमंत्री अनिल देशमुख
23 FEB 2021 : खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण. इम्तियाज जलील यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “मला आज कोरोनाची लागण झाली असून, 3 दिवसांपासून मला लक्षणे होती. तेव्हापासूनच मी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे.”
Salaam everyone
I have tested positive for Covid today.
3 days ago I had a few symptoms and had isolated since then.
Have been admitted for further treatment.Stay safe everyone, also remember in prayers.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) February 22, 2021
#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : संजय राठोडांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सर्व आरोप फेटाळले
#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : संजय राठोडांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सर्व आरोप फेटाळले