एसीबीने २ वर्गमित्रांना लाच घेताना केली अटक

माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना त्यांच्या चालकामार्फत 65 हजारांची लाच घेताना अटक केली आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी त्यांचे वर्गमित्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर तेथून थेट माजलगावला गेले आणि माजलगावमध्ये आपल्या चालकाच्या मार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देखील अटक केली आहे.
दरम्यान, वाळूची वाहतूक सुरू करायची असेल तर अगोदर हप्ता द्या दुसऱ्याकडून एक लाख दहा हजार घेतो. पण तुम्ही जवळचे आहेत म्हणून 65 हजार रुपय द्या, असा सवांद उपजिल्हाधिकारी गायकवाड आणि तक्रारदारामध्ये झाला होता आणि त्यानंतर तक्रारदाराने याची तक्रार केल्यानंतर जालना येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड आणि त्यांचा चालक लक्ष्मण काळे यांना अटक केली आहे. ही कारवाही होण्याच्या एक दिवस अगोदरच बीड येथील एसीबीच्या पथकाने पाटोदाचे गट विकास अधिकारी नारायण पिसाळ यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.