AurangabadCrime : फायनान्स चे पैशे बुडवण्यासाठी दुचाकी चोरीचा खोटा गुन्हा, दोघांना अटक

औरंगाबाद – फायनान्सवर घेतलेली दुचाकीचे पैशे बुडवण्यासाठी नाशिकच्या भामट्याने औरंगाबादच्या मित्राला दुचाकी विकली.पोलिसांच्या वाहन तपासणीत खरा प्रकार उघडकीस येताच वाळूज औद्यौगिक पोलिसांनी दोघांना अटक केली.
जितेंद्र आनंद भालेराव(४५)रा.सातपूर नाशिक व अरुण साहेबराव खंडारे(३६) बजाजनगर औरंगाबाद अशी अटक आरोपींची नावे आहेत. जितेंद्र भालेराव ने अँक्टीव्हा गाडी काही महिन्यांपूर्वी फायनान्सवर विकंत घेतली.दरम्यान फायनान्स कंपनीचे पैशे भरायला लागू नये म्हणून भालेराव ने सातपूर पोलिस ठाण्यात अँक्टीव्हा चोरीची फिर्याद देत अँक्टीव्हा औरंगाबादच्या मित्राला गाडीवरचा नंबर बदलून विकली.शहरात मंगळसूत्र चोरीला आळा बसावा म्हणून पोलिसआयुक्त डाँ.निखील गुप्ता यांनी कडक दुचाकी वाहन तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. त्यानुसार वाळूज औद्योगिक पोलिसांनी खंडारे ची गाडी अडवून तपासली.त्या अँक्टीव्हावरील नंबर बोगस निघाला अधिक तपास केला असता अँक्टीव्हा नाशिकहून खरेदी केल्याचे पोलिसांना कळले.पण या अँक्टीव्हाचा चोरी झाल्याचा गुन्हाही दाखल असल्याचे तपासात उघंड झाले.
दरम्यान पोलिस निरिक्षक मधूकर सावंत यांनी तपासाची चक्रे फिरवंत नाशिक च्या भालेराव आणि शहरातल्या खंडारे ला ताब्यात घेत चौकशी केली असता भालेराव ने गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी दोघांनाही अटक करुन कोर्टासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. पुढील तपास वाळूज औद्योगिक पोलिस करंत आहेत.