पत्नीच्या संशयी स्वभावाला वैतागून अभिनेता संदीप नहारने केली आत्महत्या

संदीप नाहर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता याने सोमवारी मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी संदीपनं फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली. लक्षवेधी बाब म्हणजे या अंतिम पत्रात त्यानं आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
अक्षय कुमारच्या “केसरी” आणि सुशांतसिंग राजपूत “एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी” यासारख्या चित्रपटात काम केलेले संदीप नाहर (30) सोमवारी मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळला त्याची पत्नी कांचन आणि मित्रांनी त्याला एसव्हीआर हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्येत होता. अखेर पत्नीच्या संशयी स्वभावाला वैतागून त्याने आत्महत्या केली असे या सुसाईड नोट्समध्ये लिहिले आहे.
“आता जगण्याची इच्छा होत नाही आहे. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा… माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतले नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”.